pimpri Crime News : ऑनलाईन जुगार घेणा-या दोघांना सामाजिक सुरक्षा पथकाकडून अटक

एमपीसी न्यूज – ऑनलाईन माध्यमातून मटका जुगार घेणा-या दोघांना पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून 15 हजारांचे जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 24) दुपारी अशोकनगर, लिंक रोड, पिंपरी येथे करण्यात आली.

मटका चालक रवींद्र खुशालसिंग वाल्मिकी (वय 31), मटका खेळी शेखर सरणदास वाल्मिकी (वय 46, दोघे रा. अशोकनगर, लिंक रोड, पिंपरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत सहाय्यक पोलीस फौजदार विजय कांबळे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोकनगर, लिंक रोड पिंपरी येथे झाडपीर बाबा मंदिराच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत दोघेजण ऑनलाईन मटका खेळत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून कारवाई करत दोघांना ताब्यात घेतले.

त्यांच्याकडून मटका जुगार खेळण्याचे 15 हजार 420 रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. आरोपी व्हाट्स अपच्या माध्यमातून जुगार खेळत होते. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.