Pimpri crime News: सासू, सासऱ्यांना मारहाण करणाऱ्यांना अडविण्यासाठी गेलेल्या जावयावर कुऱ्हाडीने हल्ला

एमपीसी न्यूज – सासू  ( Mother In Law)  आणि सास-याला ( father in Law) चारजण मिळून मारहाण करत होते. त्यामुळे त्यांची भांडणे ( quarrel) सोडविण्यासाठी गेलेल्या जावयाला  (Son in Law) चौघांनी विळा आणि कु-हाडीने मारून जखमी केले. तसेच जावयाच्या दुचाकीची तोडफोड करून नुकसान केले. ही घटना 24 जानेवारीला सायंकाळी पाच वाजता एच ए मैदान, पिंपरी येथे घडली.

रावसाहेब आण्णा काकडे, साहेबराव आण्णा काकडे, रामदास भीमा काकडे, लखन भीमा काकडे (सर्व रा. एच ए मैदान, रसरंग चौक, पिंपरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत बाबासाहेब रामदास गायकवाड (वय 23, रा. बराड वस्ती, ता. आंबेगाव) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. 24) सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास आरोपी हे फिर्यादी यांचे सासरे दगडू आण्णा काकडे आणि सासू सिंधूबाई दगडू काकडे यांना मारहाण करत होते. त्यामुळे फिर्यादी त्यांचे भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडले. त्याचा राग आल्याने आरोपी रावसाहेब काकडे याने विळ्याने मारून गायकवाड यांना जखमी केले.

त्यानंतर रामदास काकडे याने कुऱ्हाडीने गायकवाड यांच्या डोक्यात मारण्याचा प्रयत्न केला. गायकवाड यांनी हाताने कु-हाड अडवली. त्यात त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. आरोपींनी गायकवाड यांच्या दुचाकीची तोडफोड करून नुकसान केले आहे.

पिंपरी पोलीस ( Pimpri Police ) तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like