Pimpri crime News : टोळक्याने चाकूच्या धाकाने कार चालकाला लुटले

एमपीसी न्यूज – चिंचवडकडून पुण्याला निघालेल्या एका कार चालकाला अडवून चार जणांनी मिळून चाकूचा धाक दाखवून लुटले. ही घटना 5 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री एक वाजता जुना पुणे -मुंबई महामार्गावर सेंट्रल मॉल समोर घडली.

आकाश बनवारी आरजे (वय 27, रा. बिजलीनगर, चिंचवड) यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री एक वाजता आकाश आरजे त्यांच्या कार (एम एच 14 / एफ जी 3219) मधून चिंचवडकडून पुण्याकडे जात होते.

जुन्या पुणे-मुंबई महामार्गाने जात असताना पिंपरी येथील सेंट्रल मॉलजवळ चार चोरटे दुचाकीवरून आले. त्यांनी आरजे यांची कार अडवली. त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याजवळील मोबाईल फोन आणि रोख रक्कम, असा एकूण 15 हजार 300 रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.