Pimpri crime News: दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील 90 हजारांचे मंगळसूत्र पळवले

ही घटना गुरुवारी (दि. 27) सायंकाळी  सात वाजता मोहननगर, चिंचवड येथे घडली.

एमपीसी न्यूज – दोन महिला पायी चालत जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी एका महिलेच्या गळ्यातील 90 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र जबरदस्तीने चोरून नेले. ही घटना गुरुवारी (दि. 27) सायंकाळी  सात वाजता मोहननगर, चिंचवड येथे घडली.

शारदा सुरेश जगताप (वय 50, रा. मोहननगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शारदा जगताप त्याच्या मैत्रिणीसोबत गुरुवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास मोहननगर येथील संघवी कंपनीच्या गेटसमोरून पायी चालत जात होत्या.

त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी शरदा यांच्या गळ्यातील 90 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसका मारून तोडून चोरून नेले.

पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.