Pimpri Crime News : तक्रार मागे घेण्यासाठी महिलेला धमकावले, चार जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – तक्रार मागे घेण्यासाठी महिलेला धमकावल्याची घटना उघडकीस आली आहे. 1 मे 2021 रोजी भारतनगर, पिंपरी याठिकाणी हा प्रकार घडला. याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आकाश घोडके (रा. बौद्ध नगर, पिंपरी), राकेश वाघमारे (रा. मिलिंद नगर, पिंपरी), विकास किर (रा. सुभाष नगर, पिंपरी) व एक अनोळखी इसम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेनं शुक्रवारी (दि.28) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीच्या घरी येऊन खुबचंद मंगताणी यांच्या विरोधात दिलेली तक्रार माघे घ्यावी अशी धमकी दिली. तसेच, दिलेली तक्रार खोटी असल्याचे ॲफिडेव्हिट करुन कोर्टात सादर करावे असा दम भरला. आरोपींनी फिर्यादी यांच्या मुलाच्या कानशिलात भडकावली.

पुढील तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.