Pimpri Crime News : मुलाला ठार मारून मुलीवर बलात्कार करण्याची धमकी; नऊ जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – नऊ जणांच्या टोळक्याने पती-पत्नीला शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच त्यांच्या मुलाला जीवे मारण्याची व मुलीवर बलात्कार करण्याची धमकी दिली. ही घटना 18 एप्रिल रोजी दुपारी शेवाळे सेंटरजवळ पिंपरी येथे घडली.

संगीता काळे, शारदा परदेशी, सीमा वाल्मिकी, अविनाश काळे, कृष्णा काळे, निलेश काळे, आकाश परदेशी, अजय वाल्मिकी, बिरजा वाल्मिकी (सर्व रा. शेवाळे सेंटर जवळ, पिंपरी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत एका महिलेने मंगळवारी (दि. 20) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 एप्रिल रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमावला. त्यानंतर फिर्यादी महिला आणि त्यांच्या पतीला शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. तसेच ‘सोन्या उर्फ विकी ठोकळ याला दोन वेळा मारून सोडले, आता त्याचा मर्डर करून टाकतो. तुझ्या मुलीवर बलात्कार करतो’, अशी आरोपींनी फिर्यादी यांना धमकी दिली.

पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.