Pimpri Crime News : चाकण, वाकड, हिंजवडीमध्ये तीन अपघात; तिघांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – चाकण, वाकड आणि हिंजवडी येथे तीन अपघात झाले. या तीन वेगवेगळ्या अपघातात एकूण तिघांचा मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण येथील अपघातात रामदुलारे एतु प्रजापती (वय 30, रा. कुरुळी, मूळ रा. छत्तीसगड) यांचा मृत्यू झाला. प्रजापती बुधवारी (दि.9) अकराच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावर कुरुळी येथे रस्ता ओलांडत असताना अज्ञात पिकअप टेम्पोने त्यांना जोरात धडक दिली.

अपघातानंतर पिकअप चालक घटनास्थळी न थांबता तिथून पळून गेला. गंभीर जखमी झालेल्या प्रजापती यांचा मृत्यू झाला.

चाकण पोलीस तपास करीत आहेत.

_MPC_DIR_MPU_II

वाकड येथील अपघातात संतोष रामदास पांचाळ (वय 45, रा. काळेवाडी, वाकड) या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. 14 नोव्हेंबर रोजी पांचाळ त्यांच्या मोपेड दुचाकीवरून भरधाव वेगात जात होते. ते भूमकर चौक वाकड येथे आले असता त्यांची दुचाकी स्लीप झाली. त्यात त्यांच्या पायाला, हाताला, डोक्याला गंभीर इजा झाली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

वाकड पोलीस तपास करीत आहेत.

भूगाव चांदणी चौक रस्त्यावर मंगळवारी (दि.8) सव्वा अकराच्या सुमारास बावधन येथे एका दुचाकीस्वाराने पादचारी व्यक्तीला जोरात धडक दिली. त्यात पादचारी व्यक्तीचा मृत्यू झाला. अपघातानंतर दुचाकीस्वार देखील घटनास्थळी थांबला नाही. गंभीर जखमी झालेल्या पादचा-याचा मृत्यू झाला. श्याम खडका मोहनसिंग क्षेत्री (वय 40, रा. बावधन) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.