Pimpri Crime News: पोलीस लाईनमध्ये उघड्या दरवाजावाटे प्रवेश करून दोन मोबईल फोन चोरले

एमपीसी न्यूज – उघड्या दरवाजावाटे प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी घरातून दोन मोबईल फोन चोरून नेले. ही घटना 27 ऑगस्ट रोजी सकाळी सव्वासहा ते सव्वा दहा या कालावधीत पोलीस लाईन अजमेरा कॉलनी पिंपरी येथे घडली.

कौस्तुभ संपत पाडळे (वय 22, रा. पोलीस लाईन, अजमेरा कॉलनी, पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 ऑगस्ट रोजी सकाळी सव्वासहा ते सव्वादहा या कालावधीत फिर्यादी यांच्या घराचा दरवाजा उघडा होता. त्या उघड्या दरवाजावाटे घरात प्रवेश करून चोरट्यांनी 55 हजारांचा अ‍ॅपल कंपनीचा एक मोबईल फोन आणि 10 हजार रुपये किमतीचा आसुस झेन कंपनीचा एक असे एकूण 65 हजारांचे दोन मोबईल फोन चोरून नेले. याबाबत 12 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.