_MPC_DIR_MPU_III

Pimpri crime News : पालिका आयुक्त बंगल्यासमोर दुचाकींचा अपघात

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांच्या बंगल्यासमोर नो एंट्रीतून येणा-या दुचाकींचा अपघात झाला. यामध्ये दुचाकीस्वार जखमी झाला आहे. ही घटना आज (गुरुवारी, दि. 17) दुपारी चार वाजताच्या सुमारास घडली.

_MPC_DIR_MPU_IV

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मोरवाडी येथील पिंपरी न्यायालयाजवळ पालिका आयुक्तांचा बंगला आहे. बंगल्यासमोरून कुदळवाडी-पिंपरी हा रस्ता जातो. त्या रस्त्याने एक दुचाकीस्वार कुदळवाडीकडून पिंपरीच्या दिशेने तर दुसरा दुचाकीस्वार विरुद्ध दिशेने जात होता.

_MPC_DIR_MPU_II

दरम्यान त्याची दुचाकी दुभाजकावर आदळली. त्यात दुचाकीस्वार जखमी झाला. दुचाकीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

घटनास्थळी बघ्यांनी गर्दी केली. पिंपरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.