Pimpri crime News : भरधाव दुचाकीची न्यायालयाच्या प्रवेशद्वाराला धडक; दुचाकीस्वार ठार, दोघे गंभीर जखमी

एमपीसी न्यूज – मोरवाडी येथील न्यायालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराला ट्रिपलसीट भरधाव जाणा-या एका दुचाकीची धडक बसली. यामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीवरील दोन सहप्रवासी गंभीर जखमी झाले. ही घटना रविवारी (दि. 20) सकाळी अकरा वाजता घडली.

मुरली मास्तराम मोरया (वय 35, रा. हडपसर, मूळ रा. उत्तर प्रदेश) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर चव्हाण यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत दुचाकीस्वार मुरली हा त्याच्या दोन मित्रांना घेऊन मोरवाडी येथील पिंपरी न्यायालयासमोरून दुचाकीवरून (एम एच 12 / बी जे 1827) ट्रिपलसीट जात होता. त्याने भरधाव वेगात दुचाकी चालवून पिंपरी न्यायालयाच्या मुख्य लोखंडी प्रवेशद्वाराला जोरात धडक दिली.

यामध्ये दुचाकीस्वार मुरली मोरया याचा मृत्यू झाला. तर त्याचे दोन्ही सहप्रवासी गंभीर जखमी झाले.

पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.