Pimpri Crime News : जागेत गाडी पार्क केल्यावरून दोन महिलांना शिवीगाळ आणि विनयभंग

एमपीसी न्यूज – जागेत गाडी पार्क केल्याच्या रागातून दोघांनी मिळून दोन महिलांना शिवीगाळ केली. तसेच महिलांशी गैरवर्तन करत त्यांचा विनयभंग केला. हा प्रकार नेहरूनगर, पिंपरी येथे शनिवारी (दि. 20) दुपारी घडला.

विजय धनाजी पवार, प्रकाश नामदेव तांदळे (दोघे रा. नेहरूनगर, पिंपरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पीडित महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेने आरोपींच्या मोकळ्या जागेत त्यांची गाडी पार्क केली. त्या कारणावरून आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या आईला शिवीगाळ केली. त्यानंतर फिर्यादी आणि त्यांच्या आईसोबत गैरवर्तन करून त्यांचा विनयभंग केला.

‘मी आत्ताच जेलमधून सुटून आलो आहे. तुला सोडणार नाही’ अशी धमकी देत आरोपींनी फिर्यादी यांच्या आईला मारहाण केली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.