Pimpri Crime News : ज्वेलर्सच्या दुकानातून अंगठ्या चोरणारी ‘बबली’ युनिट चारच्या ताब्यात

एमपीसी न्यूज – हातचलाखीने ज्वेलर्सच्या दुकानात अंगठ्या चोरणारी ‘बबली’ ला युनिट चारच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विश्रांतवाडी येथील पार्श्वनाथ ज्वेलर्स दुकानातून या महिलेने हातचलाखीने अंगठ्या चोरून फरार झाली होती. त्यानंतर सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने तपास काढत पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आहे.

अपर्णा ससाणे असे या महिलेचे नाव आहे. तिच्या कडून 88 हजार किंमतीच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, एक दुचाकी असा एकूण 1 लाख 40 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला बीआरटी बस स्टॉप, विश्रांतवाडी येथे कुणाचीतरी वाट पाहत थांबली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. युनिट चारच्या पोलिसांनी याभागात सापळा रचून शिताफिने महिलेला ताब्यात घेतले. चौकशीअंती महिलेने चोरीची कबुली दिली. पुढील तपासासाठी आरोपी महिलेला विश्रांतवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.