Pimpri Crime News : कंपनीच्या नावाचा वापर करून बनावट सह्याद्वारे पालिकेला दिला सव्वा तीन लाखांचा एफडीआर

एमपीसी न्यूज – कंपनीच्या नावाचा गैरवापर करून तसेच कंपनीतील पदाधिकाऱ्यांच्या सह्या करून पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून कामे घेण्यासाठी 3 लाख 30 हजारांचा खोटा एफडीआर दिला. याबाबत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 19 सप्टेंबर 2019 पासून 16 डिसेंबर 2020 या कालावधीत पिंपरी-चिंचवड महापालिकेत घडला.

अतुल चंद्रकांत रासकर (वय 36, रा. भोसरी) यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी एमटीआर फार्म नंबर सहा वरील ऑनलाईन इलेक्ट्रॉनिक स्टॅम्पसाठी 8007768084 या मोबाईलचा वापर केलेली व्यक्ती आणि इतर जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांच्या अतुल आरएमसी कंपनी या नावाचा वापर करून पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून कामांचा ठेका घेण्यासाठी खोट्या साह्य करून काम घेतले. त्यासाठी आरोपींनी तीन लाख 30 हजारांचा खोटा एफडीआर / बँक गॅरंटी देऊन फिर्यादी अतुल रासकर यांची फसवणूक केली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.