Pimpri Crime News : गुरुद्वारा परिसरात वाहनांची तोडफोड ; एकाला अटक

एमपीसी न्यूज – पिंपरी येथील गुरुद्वारा परिसरात वाहनांची तोडफोड केल्याची घटना सोमवारी (दि. 12) रात्री पावणेबारा वाजताच्या सुमारास घडली. यातील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

रमेश हनुमंत जाधव (वय 32) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रमेश जाधव हा फिरस्ता आहे. त्याने सोमवारी रात्री भरपूर दारू प्यायली होती. त्याच नशेत त्याने पिंपरी येथील गुरुद्वारा परिसरात पार्क केलेल्या चार वाहनांची सिमेंट ब्लॉकच्या सहाय्याने तोडफोड केली.

घटनेची माहिती मिळताच पिंपरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आरोपी जाधव याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.