Pimpri Crime News : बौद्धनगर येथे नातेवाईकांमधील वादातून वाहनांची तोडफोड; गोळीबाराच्या फोनमुळे पोलिसांची धावाधाव

एमपीसी न्यूज – बौद्धनगर, पिंपरी येथे नातेवाईकांमध्ये घरगुती कारणांवरून वाद झाला. त्यातून झालेल्या भांडणात वाहनांचो तोडफोड झाली. ही घटना रविवारी (दि. 17) पहाटे घडली.

राम बिहारी आणि त्यांच्या नातेवाईकांचे घरगुती कारणावरून शनिवारी रात्री भांडण झाले. त्यातून एका गटाने वाहनांची तोडफोड केली. तसेच लोखंडी कोयत्याने घराच्या दरवाजावर मारून नुकसान केले.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड पोलीस नियंत्रण कक्षाला स्थानिक नागरिकांनी गोळीबार झाला असल्याची माहिती दिली. रात्रीच्या वेळी गोळीबार झाल्याची माहिती मिळाल्याने पिंपरी पोलिसांसह मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. मात्र गोळीबार झाला नसून केवळ  घरगुती कारणावरून भांडण झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. या कॉलमुळे पोलिसांची एकच धावपळ उडाली. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.