Pimpri Crime News : ‘तू घाट के पास चल, आज तुझे खतम ही कर देते है’

मुलासोबत झालेल्या भांडणाच्या कारणावरून टोळक्याची आई, वडिलांना मारहाण

एमपीसी न्यूज – मुलासोबत झालेल्या भांडणाच्या कारणावरून दहा जणांच्या टोळक्याने घरात घुसून मुलाच्या आई-वडिलांना बेदम मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना सोमवारी (दि. 29) रात्री मिलिंदनगर, पिंपरी येथे घडली.

संजय शंकर कांबळे (वय 57, रा. मिलिंद नगर, पिंपरी), यशोदा संजय कांबळे अशी मारहाण झालेल्यांची नावे आहेत. याबाबत संजय यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सनी सौदाई, अजय टाक, साहिल (पूर्ण नाव माहिती नाही), जतीन मेवाती, बाबा बीडलानी आणि त्यांचे चार ते पाच साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सनी सौदाई याला अटक केली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा आणि आरोपी यांचे भांडण झाले होते. त्या भांडणाच्या कारणावरून आरोपी हे फिर्यादी यांच्या घराचा दरवाजा तोडून जबरदस्तीने घरात आले.

त्यांनी फिर्यादी आणि त्यांच्या पत्नीला हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर मुलगा स्वप्नील याला ‘तू घाट के पास चल, आज तुझे खतम ही कर देते है’ अशी धमकी दिली.

पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.