Pimpri crime News : अभियंता तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज – अभियंता   तरुणाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (दि. 1) सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास यशवंतनगर पिंपरी येथे उघडकीस आली. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.

प्रणय पुंडलिक मराठे (वय 24, रा.यशवंतनगर, पिंपरी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रणय हा औंध येथे नोकरी करत होता. तो यशवंतनगर येथे भावासोबत राहत होता. सोमवारी भाऊ कामाला गेल्यानंतर प्रणय सायंकाळी घरात एकटाच होता.

_MPC_DIR_MPU_II

सातच्या सुमारास त्याचा एक मित्र त्याला भेटण्यासाठी आला. मित्राने अनेकवेळा दरवाजा वाजवल्यानंतरही आतून प्रतिसाद न मिळाल्याने मित्राने पिंपरी पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांनी घटनास्थळी जाऊन दरवाजा उघडला असता प्रणय घरामध्ये दोरीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. त्याला पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.