Pimpri Crime News : ‘तू काळी आहेस, आमच्या घरात शोभत नाहीस’ असे म्हणून विवाहितेचा छळ  

एमपीसी न्यूज – ‘तू काळी आहेस, आमच्या घरात शोभत नाहीस’ असे म्हणून विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 13 ऑगस्ट 2020 ते 8 एप्रिल 2021 दरम्यान हा प्रकार घडला. 

याप्रकरणी पिडित महिलेने  शुक्रवारी (दि.09) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

_MPC_DIR_MPU_II

त्यानुसार रवि अशोक दयालानी  (वय 35), मिना दयालानी (वय 46), कोमल अशोक दयालानी (वय 24) व पुनम अशोक दयालानी (वय 32) (सर्व रा. गांधी नगर, कोल्हापूर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी महिलेचा ‘तू काळी आहेस, आमच्या घरात शोभत नाहीस’ असे म्हणून शारीरिक व मानसिक छळ केला. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सावर्डे करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.