Pimpri Crime News : रुग्णवाहिका चालकाकडून रुग्णाच्या मुलीचा विनयभंग

एमपीसी न्यूज – रुग्णवाहिका चालकाने रुग्णाच्या मुलीचा विनयभंग केला. तसेच रुग्णास खाली उतरविण्याची धमकी देऊन जादा पैसे घेतले. याप्रकरणी रुग्णवाहिका चालकास अटक केली आहे. ही घटना 25 एप्रिल रोजी घडली.

किशोर पाटील, असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तसेच इतर सात जणांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 22 वर्षीय तरुणीने गुरुवारी (दि. 6) याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणीच्या आईला वायसीएम रुग्णालयातून थेरगाव येथील खासगी रुग्णालयात उपचारकरिता 25 एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास एमएच 31 सीक्‍यू 6797 या रुग्णवाहिकेतून चालविले होते. आरोपीने रस्त्यातच रुग्णास रुग्णवाहिकेतून खाली उतरविल्यास त्यांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भिती दाखवून फिर्यादी तरुणीकडून जादा पैसे घेतले. तसेच फिर्यादी तरुणीकडे वाईट नजरेने पाहून पैसे घेताना तिच्या हातालाही स्पर्श केला.

त्यावेळी फिर्यादी यांनी हात झटकला असता “चार आणे की मुलगी, बारा आणे का मसाला, असे बोलून फिर्यादीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. पोलीस उपनिरीक्षक पुरूषोत्तम चाटे अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.