Pimpri Crime News : ज्येष्ठाची नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज – ज्येष्ठ नागरिकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. मागील काही दिवसांपूर्वी पत्नीचे निधन झाल्याने आलेल्या नैराश्यातून हा प्रकार घडल्याचे म्हटले जात आहे. ही घटना आज (सोमवारी, दि. 28) सकाळी संत तुकाराम नगर, पिंपरी येथे घडली.

आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव समजू शकले नाही. त्यांचे वय अंदाजे 60 वर्ष आहे.

पोलीस उपनिरीक्षक अक्षय कोकाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत व्यक्तीच्या आई-वडिलांचे एक वर्षापूर्वी निधन झाले. त्यानंतर मागील काही दिवसांपूर्वी त्यांच्या पत्नीला कोरोनाची लागण झाली. त्यातच पत्नीचाही मृत्यू झाला. त्यांना मुलबाळ नाही. त्यामुळे मयत व्यक्तीला नैराश्य आले. याच नैराश्यातून त्यांनी राहत्या घरात पंख्याला रस्सीच्या साहाय्याने गळफास घेतला.

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.