Pimpri Crime : पिंपरी पोलिसांचा अवैध जुगार अड्ड्यावर छापा; पाच जणांना अटक, तीन लाखांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज – पिंपरी पोलिसांनी अवैध जुगार अड्ड्यावर छापा टाकून पाच जणांना अटक केली. यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे. पोलिसांनी 3 लाख 1 हजार 375 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अनिता परमानंद तखतवानी (वय 47), परमानंद चतुरमल तखतवानी (वय 48, दोघे रा. जायका चौक जवळ, पिंपरी), विशाल सांताराम कांबळे (वय 40, रा. सुबेदार रामजी आंबेडकर नगर, डिलक्स चौक, पिंपरी), महेश रामचंद कुरेसा (वय 42, रा. पिंपरी मेन बाजारा, पिंपरी), सचिन जगदीश सौदे (वय 25, रा. विजय नगर, काळेवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

आरोपी अनिता ही महिला जायका चौकाजवळ लपून छपून जुगार अड्डा चालवत होती. याची माहिती पिंपरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद वाघमारे यांना मिळाली. त्यानुसार पिंपरी पोलिसांनी जायका चौक पिंपरी येथील मालाश्री हॉटेल समोरील बिल्डींग मध्ये, दुसऱ्या माळ्यावर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर शनिवारी (दि. 19) रात्री साडेसात वाजताच्या सुमारास छापा टाकला.

पोलिसांनी या कारवाईमध्ये दोन लाख 99 हजार 800 रुपयांची रोकड आणि एक हजार 575 रुपयांचे 35 पत्त्यांचे कॅट असा एकूण तीन लाख एक हजार 375 रुपयांचा ऐवज जप्त केला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी झिरो टॉलरन्स ही मोहीम राबवली आहे. त्याअंतर्गत विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाया केल्या जात आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.