Pimpri Crime : दारुडा पती असलेल्या महिलेशी जवळीक साधून लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार; एकाला अटक

एमपीसी न्यूज – दारुडा पती असलेल्या महिलेशी मदत करण्याच्या बहाण्याने जवळीक साधली. त्यानंतर तिच्यासोबत लग्न करण्याचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. तिचा गर्भपात करून लग्नास नकार देत मारहाण केली.

याबाबत एकावर बलात्कारासह अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. हा प्रकार ऑगस्ट, सप्टेंबर 2018 पासून 22 ऑक्टोबर 2020 या कालावधीत पिंपरी, बालेवाडी येथे घडला.

गणेश भाऊसाहेब ढोरमले (वय 30, रा. मोहननगर, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडित महिलेने गुरुवारी (दि. 26) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि आरोपी गणेश यांच्या शेजारीशेजारी खाद्यपदार्थांच्या हातगाडी आहेत. त्यातून सुरुवातीला त्यांची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. महिलेचा विवाह झाला आहे. तिचा पती दारू पिऊन त्रास देतो. त्यामुळे महिलेला मदत करण्याच्या बहाण्याने आरोपी गणेश याने तिच्याशी जवळीक साधली.

महिलेचा विश्वास संपादन करून तिच्याशी लग्न करण्याचे अमिश दाखवून गणेश याने तिच्यासोसबत पिंपरी येथील घरी, बालेवाडी येथील हॉटेलवर शारीरिक संबंध प्रस्थापित केले. दरम्यान महिला गरोदर राहिली. तिला गर्भपाताच्या गोळ्या देऊन ‘गर्भपात न केल्यास लग्न करणार नाही’ अशी धमकी देत जबरदस्तीने तिच्या इच्छेविरोधात गर्भपात केला.

फिर्यादी महिलेने गणेशला लग्न करण्याबाबत विचारणा केली असता गणेश याने तिला शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. तसेच धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी गणेशला अटक केली आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सागर कवडे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.