मंगळवार, जानेवारी 31, 2023

Pimpri Crime : विद्यार्थीनीला त्रास देणाऱ्या रोड रोमियोला अटक

एमपीसी न्यूज – पिंपरीतील नव महाराष्ट्र शाळेच्या (Pimpri Crime) गेटवर विद्यार्थीनीला त्रास देणाऱ्या रोड रोमियोला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार मंगळवारी सकाळी घडला.

आदित्य उर्फ सागर संजू जाधव (वय 19 रा. पिंपरी) असे आरोपीचे नाव आहे. पिंपरी पोलीस ठाण्यात त्याच्यावर विनयभंगाचा व लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे,.

Alandi News : प्रक्षाळपूजेनिमित्त माऊली मंदिरात समाधीवर जलाभिषेक करण्यासाठी हजारो भाविकांची गर्दी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुलगी शाळेत गेली असता (Pimpri Crime) आरोपी तेथे त्याच्या दुचाकीवरून आला. फिर्यादीला तू माझ्यासोबत गाडीवर बस. मी दगडूशेठ गणपतीला नवस केला होता, की नवीन बुलेट घेतली की तिच्यावर बसवून तुला घेऊन दर्शनाला येईन, असे म्हणत त्याने फिर्यादीचा हात पकडला, फिर्यादीने हात झटकून घेत याबद्दल शिक्षकांकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले असता आरोपीने मी कोणाला घाबरत नाही, मी तुझ्यासाठी बुलेट घेतली, तू आली नाही, तर मी तुला पळवून नेईन अशी धमकी दिली होती. यावरून पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Latest news
Related news