Pimpri Crime : सामाजिक सुरक्षा विभागाचा जुगार अड्ड्यावर छापा; 13 जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा विभागाने पठारे चौकाजवळ रस्त्याच्या बाजूला सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्यावर छापा मारला. याबाबत पोलिसांनी 13 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 25) करण्यात आली.

अय्याज दाऊद शेख (वय 43, रा. कोंढवा, पुणे), रोहित भाऊसाहेब दाभाडे (वय 26), अमोल फकिरबा थुंबाळे (वय 35), साहिल रामदास दाभाडे (वय 25), स्वप्नील राजाराम दराके (28), श्याम किसन भालेराव (वय 27), सतीश रामदास मेश्राम (वय 30), सचिन अनिल नाणेकर (वय 32), सुभाष ज्ञानेश्वर पवळे (वय 36), लक्ष्मण भिवा पाथरकर (वय 30), सुनील उर्फ सोन्या कोंडीबा मुंगसे, सतीश शिंदे, रोहित (पूर्ण नाव माहिती नाही) अशी गुन्हा दाखल केलेल्या आरोपींची नावे आहेत.

याबाबत सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस शिपाई मारुती महादेव करचुंडे यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अय्याज शेख हा जुगार अड्डा चालवत होता. पठारे वस्ती ते लोहमार्ग नियोजित 90 फूट रोडच्या बाजूला सर्व आरोपी अंदर-बाहर नावाचा जुगार खेळत होते. याबाबत पोलिसांना माहिती मिळाली असता पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकला. त्यात 11 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तर दोघेजण पळून गेले.

आरोपींकडून पोलिसांनी मोबाईल फोन, रोख रक्कम, जुगार खेळण्याचा चार्ट, पत्त्यांचे कॅट, दुचाकी-चारचाकी वाहने असा ऐवज जप्त केला आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.