Pimpri Crime : पिंपरीत कोयत्याने मारहाण व गाड्यांची तोडफोड करत टोळक्याची दहशत

एमपीसी न्यूज – पिंपरीतील नेहरूनगर (Pimpri Crime) येथील सोसायटीच्या पार्कींगमधील गाड्यांची तोडफोड करून हातात कोयते फिरवत परिसरात दहशत माजवणाऱ्या आरोपींना पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार शनिवारी (दि.6) रात्री सातच्या सुमारास घडला.

यश विकास पांढरे (वय.20 रा. नेहरूनगर), श्रमन हौसराव शिंदे (वय 25) व अजित बिराजदार (वय 24) सर्व राहणार नेहरूनगर येथील राहणारे असून यांना पोलिसांनी अटक केली आहे. प्रेम सूर्यवंशी उर्फ बंडल्या (वय19), साहिल सूर्यवंशी (वय 19), एक महिला, सुजित व पंकज ओव्हाळ (पूर्ण नाव माहिती नाही) असे अटक आरोपीचे नाव असून त्यांच्या सोबत दोन अनेळखी इसम व 5 ते 6 अल्पवयीन मुले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दिलीप कस्तूर देहाडे (वय.47 रा.नेहरूनगर) व यश विकास पांढरे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pune Mumbai Express Way : पुणे – मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; ट्रक ड्राइवरचा मृत्यू

दिलीप यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार त्यांच्या सोसायटीत आरोपी व त्याचे साथीदार आले व त्यांनी हातातील कोयता हवेत फिरवत आरडा-ओरड करत परिसरात दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पार्कीगला लावलेल्या गाड्यांची तोडफोड करण्यास सुरुवात केली. यावेळी बिल्डींगमधील नागरिक खाली आले असता आरोपी तेथून पळून जाऊ लागले. यावेळी नागरिकांनी त्यातील एका मुलाला पकडले. यावरून पोलिसांनी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढिल तपास करीत आहेत.

तर, यश यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी प्रेम व साहिल यांनी फिर्यादीच्या घराजवळ गोंधळ घालत होते. यावेळी फिर्यांदी यांनी त्यांना हाटकले असता त्यांनी फिर्यादिला शिवीगाळ करत फिर्यादीच्या डोक्यात धारधार शस्त्राने मारत गंभीर जखमी केले. हातातील कोयते हवेत फिरवून आरोपींनी परिसरात दहशत निर्माण केली. यात बाळू सांडभोर व फिर्यादी यांचा भाऊ समीर मांढरे याना काही कारण (Pimpri Crime) नसताना मारहाण करत जखमी केले. यावरून पिंपरी पोलिसांनी दोन्ही गुन्हे दाखल केले असून पोलीस पुढिल तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.