Pimpri Crime : महापालिका आयुक्तांच्या बंगल्याजवळ दुचाकीस्वाराला तिघांनी लुटले

एमपीसी न्यूज – महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या मोरवाडी पिंपरी येथील शासकीय बंगल्याजवळ तीन जणांनी मिळून एका दुचाकीस्वाराला लुटले. ही घटना 25 सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजता घडली. याबाबत मंगळवारी (दि. 29) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हरदीपसिंग खेमासिंग जमीनदार (वय 48, रा. आदर्शनगर, पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी तीन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जमीनदार त्यांच्या एम एच 14 / एच सी 7641 या दुचाकीवरून मोरवाडी पिंपरी येथून जात होते. महापालिका आयुक्तांच्या शासकीय बंगल्याजवळ आले असता तीन अनोळखी व्यक्तींनी जमीनदार यांच्या दुचाकीला हात करून थांबवले.

चोरट्यांनी फिर्यादी जमीनदार यांच्याकडील चार हजारांचा मोबईल फोन, अडीच हजार रुपयांची रोकड असा एकूण साडेसहा हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने काढून घेतला. त्यानंतर चोरट्यांनी तिथून पोबारा केला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.