Pimpri Crime : घरखर्चासाठी पैसे मागितल्याने पत्नीवर चाकूने वार

एमपीसी न्यूज – घरखर्चासाठी पैसे मागणा-या पत्नीवर पतीने चाकूने वार केले. यामध्ये पत्नी जखमी झाली आहे. ही घटना शनिवारी (दि. 7) दुपारी साडेतीन वाजता संत तुकाराम नगर, पिंपरी येथे घडली.

वर्षा गणेश तोडकर (वय 33, रा. संत तुकाराम नगर, पिंपरी) असे जखमी पत्नीचे नाव आहे. त्यांनी याबाबत शनिवारी (दि. 7) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी पती गणेश नरेंद्र तोडकर (वय 44) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वर्षा आणि आरोपी गणेश हे पती-पत्नी आहेत. वर्षा यांनी आरोपी गणेशकडे घरखर्चासाठी पैसे मागितले. त्यावरून गणेश याने वर्षा यांच्यावर चाकूने वार केले. यामध्ये वर्षा यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.