Pimpri : सायबर क्षेत्रातील गुन्हेगारी, कायदे व जागरुकता विषयावरील प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज – डॉ. डी. वाय. पाटील विधी महाविद्यालयात सायबर क्षेत्रातील फसवणूक, माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 आणि वैयक्तिक माहिती संरक्षण कायदा, 2018 या विषयावर दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. एकविसाव्या शतकातील संगणक युगात, तंत्रज्ञानाचा वापर करताना घ्यावयाची काळजी तसेच त्यावरील कायदे या विषयावर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले.

प्रशिक्षण वर्गाच्या पहिल्या दिवशी सायबर तज्ज्ञ पराग नावंदर यांनी सायबर क्षेत्रातील फसवणूक व त्यासंबंधी घ्यावयाची काळजी याची माहिती वेगवेगळी प्रात्यक्षिके दाखवून दिली. डॉ. डी. वाय. पाटील विधी महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ. पदमजा काठीकर यांनी सायबर विश्व: वर्तमान आणि भविष्य या विषयावर सहभागी विद्यार्थ्यांशी चर्चा केली. पिंपरी पोलीस स्टेशनचे एपीआय अन्सार शेख यांनी सायबर क्षेत्रातील फसवणूक कशाप्रकारे होते व त्यातील पोलीस तपासाची प्रक्रिया सहभागी विद्यार्थ्यांना सांगितली.

प्रशिक्षण वर्गाच्या दुसऱ्या दिवशी वैयक्तिक माहिती संरक्षण कायदा, 2018 या विषयावर सचिन मुरूमकर (कायदेशीर सल्लागार, जॉन डियर, एशिया) आणि आनंद देशपांडे, (कायदेशीर सल्लागार, गोपनीयता आणि माहिती संरक्षण, मास्टरकार्ड) यांनी सहभागी विद्यार्थ्यांस प्रशिक्षण दिले.

प्रशिक्षण वर्गात भारतातील विविध सहा राज्यांतून विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. डॉ. डी. वाय. पाटील विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्ज्वला शिंदे यांनी विद्यार्थ्यांस मार्गदर्शन केले.प्रा.अंजुम अजमेरी व प्रा. रवींद्र बांगर यांनी प्रशिक्षण वर्गाचे संयोजन केले.प्रशिक्षण वर्गाच्या आयोजनाकरिता डॉ. डी. वाय. पाटील युनिटेक सोसायटीचे चेअरमन डॉ. पी. डी. पाटील व सचिव, सोमनाथ पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.