Pimpri : पुस्तक हंडीतून साधला परंपरा व नावीन्याचा संगम- माधुरी विधाटे 

एमपीसी न्यूज  – बाळगोपाळांमध्ये वाचनाची आवड जोपासण्यासाठी पुस्तकहंडी हा अतिशय स्तुत्य उपक्रम असून त्यातून परंपरा व नवतेचा संगम साधला आहे” असे मत ज्येष्ठ कवयित्री माधुरी विधाटे यांनी केले.जगताप डेअरी येथील मिल्कीवे इंग्लिश स्कूलमध्ये गोकुळाष्टमीच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

यावेळी चिमुकल्यांनी राधा,कृष्ण,गोपी व पेंद्या यांच्या वेषभूषा केल्या होत्या. या वेषभूषा स्पर्धेचे परीक्षण माधुरी विधाटे यांनी केले.यावेळी पुस्तकहंडी फोडून मुलांना पुस्तके वाटण्यात आली.दहीहंडीची विविध नृत्ये सादर करुन जन्माष्टमी साजरी केली.

संस्थेचे प्राचार्य डॅा.गजानन सावंत यांनी प्रास्तविक केले. संयोजन सई संकपाळ, उज्ज्वला लोखंडे, रुपाली वाडकर, अश्विनी नेवे, जयश्री हंबीर, यशश्री बाजारे, तेजस्विनी जाधव, मनीषा पाटील, पूर्वा हरकळ, सुचंद्रा चक्रबोर्ती यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.