Pimpri: दापोडी-निगडी ‘बीआरटीएस’ बस प्रवास ठरतोय अडथळ्यांची शर्यत !

एमपीसी न्यूज – अगोदरच वादात सापडलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील दापोडी ते निगडी या बहुचर्चित बीआरटीएस मार्गावरील पीएमपीएमएल बसमधून प्रवास करणे धोकादायक बनत चालले आहे. बसस्थानकावर चालकांकडून दक्षता न घेणे, बसचे दरवाजे उघडे ठेवणे, मार्गातच बस बंद पडणे, बस बीआरटी मार्गातून न जाता सेवा रस्त्याने धावणे, बीआरटी मार्गात खासगी वाहनांचा प्रवेश अशा अनेक प्रकारामुळे दापोडी- निगडी हा बीआरटीएस मार्ग म्हणजे एक अडथळ्यांची शर्यत असल्याच्या प्रतिक्रिया प्रवाशांकडून दिल्या जात आहेत.

दापोडी ते निगडी हा बीआरटीएस मार्ग आठ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर 24 ऑगस्टपासून सुरु झाला असून 12.5 किलो मीटर लांबीचा हा मार्ग आहे. या मार्गावर एकुण 36 बस थांबे उभारण्यात आले आहेत. बीआरटीएस बससाठी 3.50 मीटर रुंदीची स्वतंत्र मार्गिका बाधंण्यात आली आहे. या रस्त्यावर मध्यभागी असून विविध ठिकाणी आठ चौक, पाच ठिकाणी सब-वे, 21 मर्ज इन, मर्ज आऊट तसेच चौकांच्या ठिकाणी, मर्ज इन, मर्ज आऊट या ठिकाणी पादचारी व वाहतुकीचे सुरक्षिततेचे दृष्टीने आयआयटी मुंबई यांनी सुचविल्याप्रमाणे वाहतूक नियंत्रण दिवे, पादचारी मार्ग, झेब्रा मार्किंग तसेच विविध माहिती दर्शक सूचना फलक बसविण्यात आलेले आहेत. तथापि, पीएमपीएमएल बस चालकांकडूनच नियमांचे पालन केले जात नसल्याचे दिसून येत असल्यामुळे हा मार्ग

बीआरटी बसचे दरवाजे उघडे असतात. स्थानकावर बस प्रवासी चढू आणि उतरेपर्यंत देखील बस थांबत नाही. बस थांबा आल्यानंतर अनेक बसेसमध्ये उदघोषणाही होत नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळी प्रवाशांना कोणता थांबा आला हे लक्षात येत नाही. दरवाज्यांची दुरवस्था आहे. एखादा प्रवासी बस स्थानकाच्या दरवाज्यामध्ये अडकून जायबंदी होण्याची भीती आहे. चालकांकडून सिग्नलचे पालन केले जात नाही. पीएमएमपीएलने नियुक्त केलेले वॉर्डन देखील जागेवर नसतात. बऱ्याचदा बस बीआरटी मार्गातून न धावता सेवा रस्त्यातून त्यामुळे प्रवासी बसथांब्यावर आणि बस सेवा रस्त्यावर असा प्रकार पाहायला मिळतो. त्यामुळे बससाठी नेमके कुठे थांबायचे हे प्रवाशांना समजत नाही.

बीआरटीएस मार्गातून अनेक खासगी वाहने धावतात. त्यामुळे बीआरटी मार्ग आहे की सेवा रस्ता आहे ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या वाहनांना वॉर्डनकडून प्रतिबंध केला जात नाही. त्यातच मार्गात बीआरटी बस बंद पडण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. बंद पडलेली बस बाहेर काढण्यासाठी पीएमपीएमएल प्रशासनाकडून कोणतीही व्यवस्था करण्यात आली नाही. गेल्या आठवड्यात बीआरटी मार्गात दोन वेळा बस बंद पडल्यानंतर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. याचा नाहक त्रास प्रवाशांना सहन करावा लागता होता. एकदंरीतच दापोडी- निगडी या मार्गावरील बीआरटीतून प्रवास करावा लागणे म्हणजे मोठे संकट पार करावे लागण्यासारखे असल्याचे, प्रवासी बोलत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.