Pimpri : आदित्य बिर्ला रुग्णालय प्रकरणातील दशरथ आरडे या रुग्णाचे निधन

रेखा दुबे यांना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याची नातेवाईकांची भूमिका

एमपीसी न्यूज – आदित्य बिर्ला रुग्णालयाने आर्थिक दुर्बल घटकातून दशरथ आरडे या रुग्णावर मोफत उपचार न करता उपचाराचे पैसे नातेवाईकांनी न दिल्यामुळे त्यांना डांबून ठेवल्याचे प्रकरण अलीकडेच घडले होते. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकमान्य रुग्णालयात उपचार सुरू असताना दशरथ आरडे यांचे रविवारी (दि. 26) रात्री निधन झाले. त्यामुळे बिर्ला रुग्णालयाच्या मुख्य कार्यवाहक अधिकारी रेखा दुबे यांना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याची नातेवाईकांनी भूमिका घेतल्याची माहिती हाती आली आहे.

दशरथ आरडे यांच्या नातेवाईकांनी त्यांना आदित्य बिर्ला रुग्णालयातून लोकमान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यांच्यावर या रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले. त्यामुळे संतप्त नातेवाइकांनी आदित्य बिर्ला रुग्णालयाच्या मुख्य कार्यवाहक अधिकारी रेखा दुबे यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अन्यथा दशरथ यांचा मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेतल्याचे समजते आहे. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, याप्रकरणी वाकड पोलिसांनी रेखा दुबे यांना अटक करून जामिनावर सुटका केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.