Pimpri: जीएसटी, इन्कम टॅक्स भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी – प्रदिप गायकवाड

एमपीसी न्यूज – कोरोना विषानूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक कंपन्या, लघुउद्योग बंद करण्याचे सरकारचे आदेश आहेत. तर सरकारी खात्यात जमा होमारी जीएसटी, इन्कम टॅक्स भरण्याची मुदत 31 मार्च 2020 आहे. या काळात कंपन्या आणि कार्यालये बंद असल्यामुळे टॅक्स भरता येणार नाही. त्यामुळे जीएसटी, इन्कम टॅक्स भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्यापारी सेलचे प्रदेशाध्यक्ष प्रदिप गायकवाड यांनी केली आहे.

जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. भारतात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. त्याचा आणखी फैलाव होवू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून खासगी कंपन्या, उद्योग धंदे, लहान मोठे लघु उद्योग बंद करण्याचे सरकारचे आदेश आहेत.

तर सरकारी खात्यात जमी होणारी जीएसटी, इन्कम टॅक्स भरण्यासाची मुदत 31 मार्चपर्यंत ठरलेली आहे. या काळात सरकारी सुट्ट्या असल्यामुळे जीएसटी, इन्कम टॅक्स वेळेवर भरता येणार नाही. त्यामुळे जीएसटी, इन्कम टॅक्स भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी गायकवाड यांनी केली केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.