BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri: नगरसेविकेच्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू; आत्महत्येचा केला होता प्रयत्न

4,839
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – नगरसेविकेच्या मुलाचा आज (गुरुवारी) उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली. नववीमध्ये नापास झाल्याने नैराश्य आल्याने त्याने गळपास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

कौशिक राजू धर (वय 15, रा. थेरगाव) असे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका सुलक्षणा धर यांचा तो मुलगा होता.

  • कौशिक आकुर्डीतील एका शाळेत नववीमध्ये शिकत होता. नववीमध्ये तो नापास झाला होता. त्या नैराश्यातून त्याने 7 मार्च रोजी राहत्या घरी गळपास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्याच्यावर चिंचवड येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्याचा आज मृत्यू झाला.
.

HB_POST_END_FTR-A1
HB_POST_END_FTR-A3