Pimpri : पोलीस मुख्यालयातील कर्मचाऱ्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड पोलीस मुख्यालयात कार्यरत ( Pimpri ) असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. 28) सकाळी पिंपरी पोलीस लाईन येथे उघडकीस आली.

 

पोलीस नाईक रतन कांबळे (वय 38) असे मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

 

Pune Rural Police Recruitment : लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची कट ऑफ यादी जाहीर

 

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस नाईक रतन कांबळे हे पिंपरी पोलीस लाईन येथे राहत होते. ते पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलात पोलीस मुख्यालय निगडी येथे कार्यरत होते. मंगळवारी सकाळी त्यांच्या घराची कडी उघडत नव्हती. त्यामुळे त्यांच्या घराच्या खिडकीतून हात घालून दरवाजा उघडण्यात आला. त्यावेळी पोलीस नाईक कांबळे हे निपचित पडले होते. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप ( Pimpri ) समोर आले नाही.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.