BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : एकोणिसाव्या मजल्यावरून पडल्याने बांधकाम कामगाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – एकोणिसाव्या मजल्यावरून काम करत असताना पडल्याने बांधकाम कामगाराचा मृत्यू झाला. तर दोन कामगार जखमी झाले. ही घटना बुधवारी (दि. 10) दुपारी साडेबाराच्या सुमारास पिंपरी येथे घडली.

राजकुमार अशोक घोसले (वय 24, रा. छत्तीसगड) असे मृत कामगाराचे नाव आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरीमध्ये म्हाडाच्या इमारतीचे काम सुरू आहे. त्या इमारतीवर अनेक कामगार काम करत आहेत. राजकुमार या साईटवर प्लास्टरचे काम करत होते. क्रेनवर उभा राहून प्लास्टर करत होता. क्रेनचा ब्रेक फेल झाल्याने क्रेन एकोणिसाव्या मजल्यावरून खाली आले.

या अपघातात राजकुमार गंभीर जखमी झाला. तर अन्य दोन कामगार किरकोळ जखमी झाले. तिघांना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, राजकुमार यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

.