Pimpri : औद्योगिक कारखान्यासंबंधी निर्णय पूर्णपणे स्पष्ट करावा – गजानन बाबर

एमपीसी न्यूज – शासन अधिसूचनेद्वारे साथी रोगप्रतिबंधात्मक अधिनियम 1897 लागू करण्यात आला आहे. या अधिनियमातील तरतुदीनुसार मुंबई महानगर प्रादेशिक विकास क्षेत्र पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूर शहरामधील सर्व खासगी आस्थापना 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. यामध्ये नमूद करण्यात आलेला खासगी आस्थापना हा शब्द पूर्णपणे स्पष्ट करावा, अशी मागणी माजी खासदार गजानन बाबर यांनी केली आहे.

पिंपरी-चिंचवड तथा पुणे जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रांमधील मॅनिफॅक्चरिंग व प्रॉडक्शन या कारखान्यासंबंधी आपला काय निर्णय आहे तो पूर्णपणे स्पष्ट करावा व तशा सूचना कारखान्यांना द्याव्यात तसेच औद्योगिक कारखान्यात कोरोनोसंबंधी घ्यायच्या सुरक्षेविषयी माहिती प्रत्येक औद्योगिक कारखान्यांना द्याव्यात. जेणेकरून याबद्दल संबंधितांकडून विशेष खबरदारी घेतली जाईल, अशी मागणी माजी खासदार गजानन बाबर यांनी पुणे, विभागीय आयुक्त यांच्याकडे केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.