Pimpri : औद्योगिक परिसरातील वीजदर वाढ रद्द करण्याबाबत लघुउद्योग संघटनेने दिले तीनही आमदारांना निवेदन

एमपीसी न्यूज – सप्टेंबर २०१८ पासून झालेली सर्व औद्योगिक वीज दरवाढ संपूर्णपणे रद्द करण्यात यावी. राज्यातील औद्योगिक वीज दर नोव्हेंबर २०१६ च्या आदेशानुसार मार्च २०२० पर्यंत कायम ठेवण्यात यावेत. राज्य सरकारने सप्टेंबर २०१८ ते मार्च २०२० पर्यंतच्या दरफरकापोटी ३४०० कोटी रूपये अनुदान महावितरण कंपनीस द्यावे. याबाबतचे निवेदन पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटनेतर्फे भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे ,चिंचवड विधान सभेचे आमदार लक्ष्मण जगताप आणि पिंपरी विधानसभेचे आमदार गौतम चाबुकस्वार यांना देण्यात आले.

  • दिलेल्या निवेदनांत त्यांनी म्हटले आहे की, “सप्टेंबर २०१८ पासून झालेली सर्व औद्योगिक वीज दरवाढ संपूर्णपणे रद्द करण्यात यावी. राज्यातील औद्योगिक वीज दर नोव्हेंबर २०१६ च्या आदेशानुसार मार्च २०२० पर्यंत कायम ठेवण्यात यावेत. राज्य सरकारने सप्टेंबर २०१८ ते मार्च २०२० पर्यंतच्या दरफरकापोटी ३४०० कोटी रूपये अनुदान महावितरण कंपनीस द्यावे. हे निवेदन देताना पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी संघटनेचे सचिव जयंत कड, स्विकृत संचालक, प्रमोद राणे, निस्सार सुतार आणि संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

मुंबई येथे महाराष्ट्र चेंबरच्या कार्यालयात झालेल्या या बैठकीत राज्यातील विविध १५ जिल्ह्यातील १०० हून अधिक संघटना प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत एकमताने वरीलप्रमाणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर जिल्हानिहाय सर्व आमदार, खासदार आदी लोकप्रतिनिधींना भेटणे, निवेदन, माहिती देणे, मुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री यांना निवेदने पाठविणे. जिल्हानिहाय वीज दरवाढ विरोधी पोस्टर्स, बॅनर्स लावणे व व्यापक जनजागृती करणे ही मोहीम १ फेब्रुवारी पासून सुरू होईल.

  • आंदोलनास तिन्ही आमदारांचा पाठिंबा
    वीज दरवाढ पूर्णपणे रद्द केल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही. फेब्रुवारी अखेरपर्यंत निर्णय न झाल्यास अधिक उग्र आंदोलन करण्यात येईल, असेही निर्णय या बैठकीत एकमताने घेण्यात आलेले आहेत. यावेळी तिन्ही आमदारांना या विषयावर अधिवेशनात तारांकित प्रश्न आणि लक्षवेधी सूचना मांडू, असे आश्वासन दिले. तसेच १२ फेब्रुवारी २०१९ रोजी होणाऱ्या आंदोलनास तिन्ही आमदारांनी पाठिंबा दिला आहे.

…अन्यथा वीज बिलांची होळी करणार
राज्यातील सर्व जिल्ह्यातील सर्व औद्योगिक संघटनांच्या वतीने मंगळवार दि. १२ फेब्रुवारी २०१९ रोजी सकाळी ठीक ११ वाजता राज्यातील सर्व जिल्ह्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे जातील. मोर्चामध्ये सर्व उद्योजक आपापल्या उद्योगातील कामगारांसह आणि संबंधित सर्व व्यावसायिकांसह सहभागी होतील. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वीज बिलांची होळी करण्यात येईल, असा निर्णय आज मुंबई येथे झालेल्या राज्यस्तरीय परिषदेमध्ये एकमताने घेण्यात आलेला आहे. “अशी माहिती पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.