Pimpri: तबलिगी जमात; ‘हाय रिस्क कॉन्टॅक्ट’मधील एकजण ‘कोरोना पॉझिटीव्ह’

एमपीसी न्यूज –  दिल्लीच्या निझामुद्दीन भागातील तबलिगी जमातच्या मर्कझमधील धार्मिक कार्यक्रमांतून पिंपरी-चिंचवड शहरात आलेल्या  23 नागरिकांच्या ‘हाय रिस्क कॉन्टॅक्ट’मध्ये आलेला  आणखी एक जण आज (शुक्रवारी) पॉझिटीव्ह आला.   त्याला  कोरोनाची बाधा झाल्याचे   स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शहरातील पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या चार झाली आहे.  त्यापैकी एका रुग्णाचे पहिल्या 14 दिवसाचे नमुने निगेटीव्ह आहेत. 

 

दिल्लीमधील निजामुद्दीन परिसरात तबलीगी जमात या संघटनेच्या मर्कजमध्ये धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.  या कार्यक्रमासाठी भारताच्या विविध भागातून तसेच विदेशातून देखील मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. कार्यक्रमातील काही जण हे आधीच कोरोनाबाधित होते. त्यातील काही लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदर्शनास आले आहे.

 

पिंपरी-चिंचवड शहरातील 23 नागरिक या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या 23 नागरिकांसह  त्यांचे 5 नातेवाईक असे  28 पैकी  बुधवारी दोघे पॉझिटीव्ह आले होते. तर, इतर 26 निगेटीव्ह आले होते.

या 23 नागरिकांच्या ‘हाय रिस्क कॉन्टॅक्ट’मध्ये आलेल्या आणखी सहा जणांना गुरुवारी  महापालिका रुग्णालयात दाखल केले होते. त्यापैकी  आज एकाचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.

शहरात आजपर्यंत 15 पॉझिटीव्ह रुग्ण, 11 जणांना सोडले घरी

पिंपरी-चिंचवड शहरात आजपर्यंत कोरोनाचे 15 रुग्ण सापडले होते. त्यापैकी 11 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. दिल्लीतून आलेले दोन, त्यांच्या संपर्कातील एक आणि पहिल्या बारापैकी एक असे चार रुग्ण पॉझिटीव्ह आहेत. त्यातील पहिल्या बारापैकी एकाचे पहिल्या 14 दिवसांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. उद्या त्याचे दुसरे रिपोर्ट आल्यानंतर त्याला घरी सोडण्यात येईल,  असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like