Pimpri : दुकानासाठी मागवलेले 27 लाख 85 हजार रुपयांचे मोबाईल घेऊन डिलिव्हरी बॉय फरार

एमपीसी न्यूज – दुकानात विक्रीसाठी मागवलेले 27 लाख 85 हजार रुपये किमतीचे महागडे 65 मोबाईल फोन घेऊन डिलिव्हरी बॉयने पलायन केले. ही घटना 8 एप्रिल ते 21 एप्रिल यादरम्यान पिंपरी येथे घडली.

अमित कुमार सुरेश कुमार जैन रा. गोरेगाव, वेस्ट मुंबई असे पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे. अमित हिरानंद आसवाणी वय 23, रा. पिंपरी यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

  • हिरानंद आसवाणी हे पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी उपमहापौर आहेत. त्यांच्या मुलाचे पिंपरीमधील साई चौकात पियुष मोबाइल कॅफे हे दुकान आहे.

पोलीस उपनिरीक्षक अशोक निमगिरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित यांनी मुंबईमधील डीलरकडून आयफोन एक्स कंपनीचे 35 मोबाईल आणि एमआय नोट्स 7 प्रो कंपनीचे 30 मोबाईल असे एकूण 65 मोबाईल फोन मागवले होते.

  • हे 27 लाख 85 हजार रुपये किमतीचे मोबाईल फोन अमितकुमार जैन हा घेऊन येणार होता. मात्र त्याने मोबाईल फोनची डिलिव्हरी न देता पलायन केले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पिंपरी पोलिस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.