Pimpri : पीसीएनटीडीएच्या भूखंड वाटपामध्ये महिला सामाजिक संस्थांसाठी 50 टक्के आरक्षणाची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणतर्फे सामाजिक संस्थांना वाटण्यात येणा-या 84 भूखंडांपैकी 50 टक्के भूखंड महिला सामाजिक संस्थांसाठी आरक्षित ठेवावे, अशी मागणी मानिनी फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे. यासंबंधीचे निवेदन पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे यांना देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवडमध्ये शहराच्या एकूण लोकसंख्येच्या 50 ते 60 टक्के लोकसंख्या महिलांची आहे. अनेक महिला संस्था महिलांकरीता सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक विषयात कार्यरत आहेत. महिलांच्या सांस्कृतिक, समाजिक, शैक्षणिक विकासाला वाव देण्यासाठी महिलांना सदर भूखंडापैकी 50 टक्के भूखंड वाटप केल्यास महिला सक्षमीकरणासाठी मदत होऊन महिलांची आर्थिक उन्नती साधली जाईन.

तसेच मागणीचा सहानुभूतीपुर्वक विचार करावा, अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.