Pimpri : रिअल इस्टेटच्या व्यवसायासाठी माहेरहून दोन लाख रुपये आणण्याची विवाहितेकडे मागणी

एमपीसी न्यूज – रिअल इस्टेटचा व्यवसाय करण्यासाठी विवाहितेकडे माहेरहून दोन लाख रुपये आणण्याची मागणी करत तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. याप्रकरणी सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी 29 वर्षीय विवाहितेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती करमचंद ग्यानचंद भाट (वय 32), सासू अलका ग्यानचंद भाट (वय 51), सासरे ग्यानचंद भाट (वय 54), लता रमेश तामचीकर (वय 65), श्रद्धा योगेश बागडे (वय 29) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला सासरी नांदत असताना आरोपींनी त्यांच्याकडे रिअल इस्टेटच्या व्यवसायासाठी माहेरहून दोन लाख रुपये आणण्याची मागणी केली. त्यावरून त्यांना वारंवार शिवीगाळ करून हाताने मारहाण करून धमकी देत शारीरिक व मानसिक त्रास दिला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.