Pimpri : वाढत्या उष्णतेमुळे टोपी, गॉगल्सला मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या चार ते पाच दिवसांपासून पारा चाळीशी (Pimpri )जवळ गेला आहे. दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत असल्याने उष्णतेपासून बचाव होण्यासाठी नागरिक टोपी, गॉगल्स, स्कार्प आदी वस्तूंची खरेदी करताना दिसून येत आहेत. त्यामुळे बाजारपेठेत सगळीकडे या वस्तूंचे स्टॉल दिसून येत आहेत.

दुपारी बारानंतर घराबाहेर पडणे नागरिकांना नकोसे वाटते. परंतु ना विलाज असेल आणि (Pimpri )कामावर जाणे गरजेचे असल्याने उद्योगनगरीतील काही भागातील रस्ते दुपारी मोकळे दिसत असले तरी एमआयडीसीतील रस्ते मात्र शिपनुसार नागरिकांनी भरलेले दिसून येत आहेत. परंतु उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिक गॉगल्स, डोक्याला ऊन लागू नये यासाठी टोपी तसेच महिला वर्ग स्कार्प वापरताना दिसून येत आहे. नागरिकांची मागणी लक्षात घेऊन बहुतांश हातगाडी, फिरते विक्रेते यांनी रस्त्याच्या कडेला या वस्तूंची विक्री करणारी दुकाने थाटली आहेत.

Chinchwad: प्रीपेड टास्क च्या बहाण्याने  तरुणीची 13 लाख रुपयांची फसवणूक

उन्हाच्या चटक्यापासून बचाव होण्यासाठी बहुतांश नागरिक रस्त्याच्या कडेला गाडी पार्क करून त्यांच्याकडून टोपी, गॉगल्स आदी वस्तुंची खरेदी करताना दिसून येत आहेत. नागरिकांनी गॉगल खरेदी करताना काळजी घेणे गरजेचे आहे. बहुतांश नागरिक पैशांची बचत होत असल्याने साध्या गॉगलला प्राधान्य देत आहेत. परंतु अशा गॉगलमुळे डोळे जळजळ करणे, दुखणे अशाप्रकारचे त्रास होऊ शकतात. त्यामुळे शक्यतो चांगल्या दर्जाचे गॉगल किंवा हेल्मेट घ्यावे. जेणे करून आपले शारीरिक अवयवांना इजा होणार नाही.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.