BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : धनगर आरक्षणावर सरकारचे डोळे उघडण्यासाठी रविवारी पिंपरीत जाहीर सभा

पडळकर आणि जानकर करणार सभेला संबोधित

409
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – धनगर समाजाच्या एस.टी. आरक्षणासंदर्भात सरकारचे डोळे उघडण्यासाठी सकल धनगर समाज पिंपरी-चिंचवडच्या वतीने येत्या रविवारी (दि. 17) पिंपरीत जाहीर सभा होणार आहे. याबाबतची माहिती सकल धनगर समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी आज (गुरुवारी) काळेवाडीत झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर रविवारी सायंकाळी साडेचार वाजता ही सभा होणार आहे. धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर, उत्तमराव जानकर मार्गदर्शन करणार आहेत.

धनगर समाजाचा एस.टी. प्रवर्गात समावेश करण्याची मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. मात्र, सरकारकडून टोलवाटोलवी सुरू आहे. धनगर समाजाचा एस.टी. प्रवर्गात समावेश करण्यास सरकार वेळकाढूपणा करीत आहे. याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला राज्यभरातील धनगर समाज बांधवांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सकल धनगर समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.