Pimpri: रक्षाबंधन सणानिमित्त 19 जुलैपासून राखी विक्रीस परवानगी द्या

Demand for permission to sell rakhi from July 19 on the occasion of Rakshabandhan festival :राखी उत्पादक सीमा कुंकुलोळ यांची मागणी

एमपीसी न्यूज – शहरात दहा दिवसांकरिता लागू असलेल्या लॉकडाउन 19 जुलैपासून अंशतः शिथील केला जाणार आहे. यात अत्यावश्यक सेवा देणाऱ्या व्यावसायिकांचा समावेश असणार आहे. याच पार्श्वभूमीवर येत्या 3 ऑगस्ट रोजी घराघरात साजरा होणाऱ्या रक्षाबंधन सणानिमित्त राखी विक्रीसाठी 19 जुलै पासून परवानगी द्यावी, अशी मागणी राखी उत्पादक सीमा कुंकुलोळ यांनी केली आहे.

याबाबत कुंकुलोळ यांनी महापौर उषा ढोरे, आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, राखी व्यवसायात वर्षभर हाजारो हात कार्यरत असतात. अनेक कुटुंब यावर अवलंबून असतात.

शहरात अनेक गरजू महिला व अंध-अपंग बांधवांना या व्यवसायातून वर्षभर रोजगार मिळत आहे. राखीचे उत्पादन हे हस्तकलेतून करण्यात येते.या व्यवसायात अद्यापही कोणत्याही प्रकारचे मशीन काम करीत नाही.

वर्षभर मेहनत करून या राख्या आपल्या उद्योगनगरीत बनविल्या जात आहेत. येथील राख्या राज्यभर पाठविल्या जातात. सुमारे चार ते पाच हजार व्यापारी, कामगार,गरजू महिला,अंध-अपंग व्यक्ती या व्यवसायावर अवलंबून आहेत.

_MPC_DIR_MPU_II

कोरोनाचे संकट असले तरीही नात्यांची वीण घट्ट करणारी ही राखी घेण्यासाठी अनेक महिला बाजारपेठेत जाणार आहेत.

24 जुलै रोजी लॉकडाऊन संपताच राखी खरेदीसाठी अनेक किरकोळ व्यावसायिक घाऊक व्यापाऱ्यांकडे खरेदीसाठी जाणार जातील. ग्राहकांची पावले सुद्धा बाजारपेठेत वळणार आहेत. यामुळे बाजारपेठेत गर्दी वाढू शकते.

राखी पाठविण्यासाठी पोस्ट व कुरियर सेवा मिळावी, यासाठी ग्राहक धावपळ करतील. जर पिंपरी-चिंचवड शहरात 19 जुलै पासून राखी विक्रीच्या व्यवसायाला परवानगी दिल्यास सर्व नियमांचे पालन करून व्यावसायिक ग्राहकांना योग्य सेवा देऊ शकतील. ग्राहकांना राखी खरेदीसाठी पुरेसा वेळ सुद्धा मिळेल.

शहरातील सर्व राखी निर्माते,कामगार व विक्रेते यांच्या मागणीचा सहानभूतीपूर्वक विचार करावा. वर्षभर तयार झालेल्या राख्या जर विक्री झाल्या नाही तर पुढील काही महिन्यात उत्पादन बंद ठेवावे लागेल. यामुळे हजारो जण वर्षभरासाठी बेरोजगार होतील.

या सर्व गोष्टींचा विचार करून आपण 19 जुलैपासून पिंपरी-चिंचवड शहरात राखी विक्रीच्या दुकानांना परवानगी द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1