BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : पार्किंगसाठी मागितला 50 हजारांचा हप्ता

0 307
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज- गॅस एजन्सीची गाडी रस्त्यावर लावत असल्याने ब्लॅकमेल करून 50 हजारांची खंडणी मागितली. या प्रकरणी सोमवारी (दि. 15) एकावर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी अमोल भागवत विधाते (वय-36 रा.मोशी) यांनी फिर्याद दिली असून सरदार रविंदर सिंग (वय-48 रा.दोपाडी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आले आहे

फिर्यादी यांची गॅस एजन्सी आहे. ते आण्णासाहेब मगर स्टेडीअम जवळ एजन्सीच्या गाड्या लावत असे. कारणावरून सिंग त्या ठिकाणी आला. रस्त्यावर गाड्या लावत असल्याचा जाब विचारत धमकी दिली. तसेच हे प्रकरण मिटविण्यासाठी ५० हजार रुपये मागितले व दरमहा 10 हजार रुपयांचा हप्ता मागितला व हप्ता नाही दिल्यास एजन्सीवर कारवाई करु म्हणून धमकी दिली. उपनिरीक्षक हरिदास बोचरे अधिक तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.