BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : ‘पिंपरी किंवा चिंचवड मतदारसंघ काँग्रेसला द्या’ ; शहर काँग्रेसची वरिष्ठांकडे आग्रही मागणी

एमपीसी न्यूज – आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीची चर्चा सुरु आहे. पिंपरी किंवा चिंचवड या दोन्ही विधानसभा मतदारसंघापैकी एक मतदार संघ काँग्रेसला सोडण्याची आग्रही मागणी केली आहे. वरिष्ठांनी देखील एक जागा घेण्यासाठी प्रयत्न करण्याचा शब्द दिल्याचे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी ‘एमपीसी न्यूज’शी बोलताना सांगितले. तसेच आमच्याकडे सक्षम उमेदवार असल्याचेही त्यांनी सांगितले.

विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी होण्याचे संकेत आहेत. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने शहरातील पिंपरी किंवा चिंचवड या दोन मतदारसंघापैकी एक मतदारसंघ सोडण्याची मागणी केली आहे.

काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे म्हणाले, “दोन्ही काँग्रेस 2009 ची विधानसभा निवडणूक आघाडीत लढले होते. चिंचवड विधानसभा मतदारसंघ काँग्रेसला सुटला होता. 2014 ची विधानसभा निवडणूक दोन्ही पक्षांनी स्वतंत्र लढविली होती. आगामी निवडणुकीसाठी आघाडी करण्याच्या चर्चा सुरु आहेत. काँग्रेस इच्छुकांच्या मुलाखती झाल्या आहेत. काँग्रेसने पिंपरी किंवा चिंचवड या दोन मतदारसंघापैकी एक मतदारसंघ देण्याची मागणी केली आहे. दोन्ही पैकी कोणताही मतदारसंघ काँग्रेसला देण्यात यावा, अशी आमची आग्रही मागणी आहे.

प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे कार्यकर्त्यांच्या भावना पोहचविल्या आहेत. त्यांनी देखील आघाडीत दोन्हीपैकी एक जागा काँग्रेसला मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याचा शब्द दिल्याचे साठे यांनी सांगितले. भोसरी मतदारसंघावर दावा केला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सन 2014 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवारांना मिळालेली मते

पिंपरी मनोज कांबळे – 11 हजार 22 मते
चिंचवड कैलास कदम – 8 हजार 643 मते
हनुमंतराव भोसले – 14 हजार 363 मते

HB_POST_END_FTR-A2

.