Pimpri : महामार्गावरील दिशादर्शक नामफलक योग्य ठिकाणी लावण्याची मागणी

एमपीसी न्यूज – राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने चुकीच्या ठिकाणी लावण्यात आलेले नामफलक तात्काळ काढुन योग्य ठिकाणी लावण्यात यावेत, अशी मागणी शिवसेना विधानसभा संपर्कप्रमुख तथा शिवशाही व्यापारीसंघ प्रदेश अध्यक्ष युवराज दाखले यांनी पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनांद्वारे केली आहे.

निवेदनांत म्हटले आहे की, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने वाहनचालकांच्या व परराज्यातुन येणाऱ्या नागरिकांच्या सोईसाठी सभोवतालच्या गावालगत दिशादर्शक नामफलक लावले आहेत. परंतु, सदरील फलक चुकीच्या ठिकाणी लावले आहेत. उदाहरणार्थ, बालेवाडीकडुन देहुरोडकडे जाताना महामार्गालगत वाकडगावचा दिशादर्शक फलक बालेवाडीकडे लावण्यात आला आहे. तसेच ते नामफलक नादुरुस्त अवस्थेत आहेत. त्यामुळे वाहनचालकांची दिशाभूल होत आहे.

येत्या पाच दिवसात सदर महामार्गालगत गावालगतच्या ठिकाणी लावलेले नामफलक योग्य ठिकाणी व दुरूस्त करून न लावल्यास शिवशाही व्यापारीसंघाच्या वतीने शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.