BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : संपादित केलेल्या जमिनीसाठी एकरी 5 गुंठे परतावा देण्याची उद्योगमंत्र्यांकडे मागणी

वंदेमातरम शेतकरी विकास संघटनेतर्फे उद्योगमंत्र्यांना निवेदन

0

एमपीसी न्यूज – माण हिंजवडी आणि इतर वाड्या वस्त्यावरील आय टी पार्कच्या निमित्ताने शेतकऱ्यांकडून संपादित केलेल्या जमिनीच्या मोबदल्यात शेतकऱ्यांना उदरनिर्वाहासाठी एकरी 5 गुंठे परतावा देण्यात यावा व त्यांच्या मुलांना उद्योगधंदा करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे अशी मागणी वंदेमातरम शेतकरी विकास संघटनेचे अध्यक्ष जनार्दन पायगुडे यांनी राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे केली आहे.

याबाबत दिलेल्या निवेदनात पायगुडे यांनी म्हटले आहे की, 1998 साली आयटी पार्कच्या निमित्ताने मुळशी तालुक्यातील माण हिंजवडी व इतर वाड्या वस्त्यावरील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या. नियमानुसार संपादित जमिनीवर आयटी पार्ककडून बांधकाम करणे अपेक्षित होते. परंतु आजपर्यंत कोणत्याही प्रकारचे बांधकाम आयटी पार्क कडून करण्यात आले नाही. तसेच संपादित केलेल्या जमिनीच्या मोबदल्यात शेतकऱ्यांना योग्य तो मोबदलाही देण्यात आलेला नाही. वाड्या वस्त्यावरील शेतकऱ्यांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी एकरी 5 गुंठे परतावा मिळावा आणि शेतकऱ्यांच्या मुलांना उदयॊगधंदा करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे अशी मागणी जनार्दन पायगुडे यांनी केली आहे.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like