Pimpri : हक्काचे अन्नधान्य मिळाले नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा पिंपरी युवा सेनेचा इशारा

एमपीसी न्यूज – गोरगरिबाना त्यांचं हक्काचं अन्न धान्य मिळाले नाही तर, तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा पिंपरी युवा सेनेने अन्नधान्य वितरण परिमंडल अधिकारी यांना दिला आहे.

याबाबत दिलेल्या निवेदनांत त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहरातील रेशन दुकानदार व भ्रष्ट अधिकारी यांच्या संगनमताने अन्नधान्याचा काळाबाजार होत असून गरीब व गरजू नागरिकांना स्वस्त धान्य न मिळाल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या गैरप्रकाराला आळा घालुन व पीओएस मशिनद्वारे पावती देणे बंधनकारक करावे असे निवेदनात म्हटले आहे.

यावेळी जिल्हा समन्वयक जितेंद्र ननावरे, रुपेश कदम, युवती सेनाधिकारी प्रतीक्षा घुले, विभागप्रमुख राजेश वाबळे, विभागसंघटक निलेश हाके, दक्षता समिती सदस्य वैभवी घोडके, विभाग संघटिका कामिनी मिश्रा, राहुल पलांडे, विनय खमगल, सनी कड, अजय पिल्ले उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.