Pimpri : ‘मेट्रो’चे लहूजी वस्ताद साळवे नामकरण करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ – महापौर जाधव

एमपीसी न्यूज – पवनाथडी, भीमथडी जत्रेच्या धर्तीवर वाटेगाव जत्रा, अण्णाभाऊ साठे चित्रपट महोत्सव, पारंपरिक स्पर्धांचे नियोजन तसेच लहूजी वस्ताद साळवे मेट्रो नामकरण करण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. याबाबत चर्चा करुन सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा प्रबोधनपर्व कार्यक्रम एका समाजापुरता मर्यादित नसावा. अण्णाभाऊंचे साहित्य व त्यांचे कार्य सर्वसमावेशक होते, असे महापौर राहुल जाधव म्हणाले.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रबोधन पर्वाच्या पूर्व तयारीच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या बैठकीवेळी ते बोलत होते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, सभागृह नेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील आदी बैठकीला उपस्थित होते.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रबोधन पर्वाचे नियोजन सुयोग्यपणे करण्याच्या सूचना महापौर राहूल जाधव यांनी दिल्या. सर्व समाज बांधवांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रबोधन पर्व उत्साहात साजरे करण्यासाठी सर्व शहरवासियांना सहभागी करून घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत, असेही ते म्हणाले.

“शासन योजना समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचली पाहिजे. सर्व स्तरातील समाज बांधव या प्रबोधन पर्वात सहभागी असतात. या प्रबोधन पर्वात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ यांच्या जीवनपटावर आधारित पुस्तके द्यावीत, तसेच विविध महापुरुषांच्या जीवनावरील चित्रपट / लघुपट दाखवावेत” असे एकनाथ पवार म्हणाले. “साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रबोधन पर्वासाठी निधी कमी पडू देणार नाही. या पर्वानिमित्त समाजातील शालेय विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य करण्यात यावे” असे विलास मडिगेरी म्हणाले.

महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे म्हणाले, “लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्याबाबत महापालिका सभेत ठराव पारित करुन शासनाकडे पाठविण्यात यावा. समाजातील 10 विद्यार्थ्यांचा एमपीएससी व युपीएससीसाठी येणारा खर्च महापालिकेने करावा. तसेच अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात यावे.

HB_POST_END_FTR-A2
You might also like